कॅचेस विन मॅचेस......

आपल्या खेळाडूना यांच्या कडून प्रशिक्षण दिले पाहिजे...


 

टिपणी: हा विडीओ माझा नाही आहे. मला इमेल द्वारे आला होतो आणि आवडला म्हणून मी सर्वांसाठी माझ्या ब्लोग वर पोस्ट केला. याचे सर्व हक्क मूळ मालकाचे आहेत. मूळ मालकाचे नाव माहित नसल्या कारणास्तव पोस्ट केले नाही आहे. मूळ मालकाचे नाव कळाल्याच पोस्ट करण्यात येईल. तरीही मूळ मालकाची पोस्ट बद्दल हरकत असल्यास पोस्ट काढला जाईल.

मेरा देश महान ??????

आपण अशा देशात राहतो, जिकडे पीझा आंब्युलेन्स आणि पोलिसां पेक्षा लवकर येतो.

जिकडे आपल्याला वाहनान साठी कर्ज ८ % नि मिळते आणि शिक्षणा साठी १२ % नि.

७६ पोलिस जवान दुष्टा पणे मारले गेले आणि आपली प्रसार माध्यम सानिया व शोएबच लग्न समारंभ दाखवण्यात गुंतले होते.

जेथे तांदूळ ७० रुपये प्रती किलो मिळतो, पण मोबाईल सीम कार्ड मात्र फुकट मिळते.

जेथे देशातले काही करोडपती क्रिकेट संघ विकत घेऊ शकतात, पण सत्कर्मासाठी दान नाही करू शकत.

जेथे काही लोक चहाच्या टपरीवर बसून बाल मजुरीवर गप्पा मारतात आणि बोलतात कि बाल मजुरीला प्रवृत्त करणाऱ्यांना फाशी दिली पाहिजे. मग तेच थोड्या वेळाने ओरडतात "छोटू मस्त गरम ५ कटिंग घेऊन ये रे"

एवढ सर्व असून सुद्धा आपण म्हणतो ना "मेरा देश महान"..... खरोखरच आपला देश महान आहे का????

टिपणी: हि गोष्ट मला इमेल आणि एस.एम.एस द्वारे इंग्रागी आला होतो आणि आवडल म्हणून मी मराठीत अनुवादन करून सर्वांसाठी माझ्या ब्लोग वर पोस्ट केला. याचे सर्व हक्क मूळ मालकाचे आहेत. मूळ मालकाचे नाव माहित नसल्या कारणास्तव पोस्ट केले नाही आहे. मूळ मालकाचे नाव कळाल्याच पोस्ट करण्यात येईल. तरीही मूळ मालकाची पोस्ट बद्दल हरकत असल्यास पोस्ट काढला जाईल. 

सिनेमांच्या आईचा घो.

हल्लीच प्रदर्शित होवून गेलेले शिक्षणाच्या आईचा घो, आणि ३ idiotsह्या सिनेमांनी पालकांची मानसिकता बरीच बदलून टाकली. कालपर्यंत करियर oriented असलेली आपली पप्पा आणि मम्मी मधला फरक पाल्यांना सुद्धा जाणवू लागला. नुकताच नोकरीच्या क्षेत्रात पावूल टाकलेल्या पिढीचा आणि त्यात हि मनाविरुद्धच्या क्षेत्रात नोकरी करणाऱ्या  मुलांचा तर जीव चुरचुरला  असेल हे सिनेमे पाहून. आपण शाळा कोलेजात असताना जर आपल्या आईवडिलांनी हा सिनेमा पहिला असता तर आपण देखील मनाप्रमाणे काम करू शकलो असतो, असे त्यांना वाटत असेल.
मी माझ्याबद्दल विचार करतो, तेव्हा जाणवत.
माझ्या जर आईने मी आठवीत असताना तुला काय हवे ते करसांगितले असते तर.......?
पहिली तर मी शाळा सोडली असती.
आणि दुसरे  म्हणजे.............. दुसरे म्हणजे.................. दुसरे म्हंजे ...............
दुसरे काय........? मी काय केलं असतं .......?
तसा  मी क्रिकेट खेळायचो, पण त्याचा उपयोग आमच्या टीमला देखील कधी होत नव्हता. 'आईचा घो' मधला मुलगा एका वेळेला २०० करायचा....
त्याच्या मध्ये ती  काबिलीयत  होती. मी टेनिसच्या बोल  वर ८ ओवरची match  खेळणारा मुलगा... २०० करायला काय.... कसला स्कोपच नव्हता. नाही म्हणायला आमच्या शाळेमध्ये मी दहावीला असताना हार्ड बोल क्रिकेट सुरु झाले होते. पण selection च्या वेळेस समजले कि ते आमच्या सारख्या रात्रंदिवस अभ्यास करून ४०% मिळवणाऱ्या मुलांसाठी नव्हते.  तर मुळात अभ्यासामध्ये हुशार असणाऱ्या आणि पहिल्या ५ मध्ये नंबर येणाऱ्या मुलांसाठी होते. selection ची गम्मत सांगतो.
ज्या मुलांना शाळेच्या टीममध्ये खेळण्यात  intrest आहे त्यांनी शाळा संपल्यावर शाळेच्या गच्ची वर एकत्र जमावे. अशी notice एक दिवस वर्गात आली आणि थोडा वेळ का होईना पण मी स्वतःला पांढरया शुभ्र कपड्यात लॉर्डसच्या बाल्कनी मध्ये उभा पहिला. world cup च्या वेळेस झिंगलेला गावस्कर पहिला आहे का....? नशेच्या कारणात फक्त फरक होता.  
बसस... फाजील आत्मविश्वासाने मी गच्चीवर गेलो,  तर गच्चीवर शाळेतली सगळीच मुले हजर होती. विचार करा, १९८९ साली सुद्धा काय competition  होती. वर्गामधला पहिला नंबर काढणारा मुलगा selection करायला होता. माझा नंबर आला तसे त्याने मला विचारले, LBW म्हणजे काय...?क्रिकेट ची तोंडी परीक्षा....? मला समजेना ground वर प्रतिस्पर्ध्याला प्रश्न विचारून out करायचे होते कि काय? गाळलेल्या जागा भरा कि एक रन, एका वाक्यात उत्तरे द्या २ रन्स, संदर्भासहित स्पष्टीकरण - चौका....... आणि निबंध लिहिला कि SIXER
मी लगेच स्वतःला सावरून उत्तर दिले, बोल stump वर जात असेल आणि batsman च्या पायाला लागला तर LBW.  अर्थात माझी काही निवड झाली नाही. पण माझ्या उत्तरा मध्ये काय चुकले हे देखील मला तेव्हा समजले नव्हते. LBW म्हणजे काय? ह्या प्रश्नाला त्या मुलाला अपेक्षित असलेले उत्तर काय होते माहिती आहे तुम्हाला.....? तुम्ही वर्गातले असाल तर लगेच उत्तर द्याल.  उत्तर सोपे होते, त्याला अपेक्षित असलेले उत्तर होते LBW म्हणजे leg before .' पण हे मला समजेपर्यंत माझ्या wilson gymkhanya वर ८ ओवरच्या matches मध्ये   दहा हजार धावा आणि ५०० बळी पूर्ण झाले होते.
पण त्याचा बाहेरच्या व्यवहारिक जगाशी काहीच संबंध नव्हता. त्यामुळे आपण क्रिकेट मध्ये करियर करू शकत नव्हतो ह्या गोष्टीची मला तेव्हा नव्हती पण आता खात्री आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे जसे इतर मुलांना स्वतबद्दल वाटते तसे मला हि वाटत होते कि मी चांगला  नाचतो, पण ते देखील वाडीमध्ये नवरात्रीत गरबा नाचण्या पलीकडे कधी गेलो नाही. वास्तविक इतरांसोबत नाचताना तर माझे आणि माझ्यामुळे  इतरांचे हाल व्हायचे. एखादे पाऊल इकडच्या ऐवजी तिकडे टाक म्हणून नाच शिकवणाऱ्या  माणसाने   सांगितले तर माझी पंचाईत व्हायची. त्यामुळे बऱ्याच सांस्कृतिक कार्यक्रमातून माझा शाल आणि श्रीफळ देवून सत्कार झाला होता.
गाण्याची अवस्था तर त्याहीपेक्षा वाईट होती. केवळ हिंदी सिनेमा मधली गाणी तोंडपाठ होती म्हणून मला असे वाटत होते कि मी गाणी गाऊ शकतो, पण एक दिवस माझ्या एका परम मित्राने माझ्या आवाजात एक गाणे रेकॉर्ड करून मला ऐकवले व माझा गैरसमज दूर केला. अखिल  भारतीय संगीत अकादमी माझ्या ह्या मित्राचे उपकार कधीही विसरणार नाही, अशी आशा करतो.
चित्रकला आणि हस्तकला हे तर शाळेतले विषय, आणि शाळेत काही शिकायला मिळेल, हि अपेक्षा मी करणेच चुकीचे होते. शाळेत मी का जायचो आणि गेल्या वर करायचो काय? हे आज हि मला कळलेले नाही. सहा महिन्यातून एकदा पालकांना भेटायला शिक्षक बोलवायचे. माझी मोठी बहिण माझ्या शिक्षकांना येवून भेटायची, आईवडील कधी यायचे नाहीत, कारण त्या दिवशी मी संध्यकाळी शाळेतून घरी गेल्यावर त्यांना मोठी जबाबदारी पार पाडायची असायची.
पण असे असून देखील पहिली ते दहावी मी कधीही नापास झालो नाही, ते केवळ आईच्या धाकामुळे. कारण मला माहिती होते कि, मी नापास झालो असतो तर आई ने मला झोडून  काढला असता.

आज मला हे कबूल करायला  लाज वाटत नाही, कारण त्यावेळी मी एकटा असा नव्हतो. थोड्या फार फरकाने माझ्यासारखी बरीच मुले माझ्या आजूबाजूला होती. खरे तर माझ्यासारख्या मुलांचे प्रमाणच अवतीभोवती जास्त होते. वर्गात पहिल्या पाचात येणारी काय हो, पाचच होती, बाकीचे सर्व तर आम्हीच होतो. माझ्याही पेक्षा चांगले क्रिकेट खेळणारी, नाचू गाऊ, चित्रे काढू शकणारी मुले बरीच होती. पण कुणीही तेंडूलकर, अमिताभ, आणि एम एफ हुसेन होण्याची महत्वाकांक्षा बाळगून नव्हता. कारण प्रत्येक जण आपली कुवत ओळखून होता. त्यामुळे कुणाच्याहि मनात आत्महत्येचे  विचार येत नव्हते.
आजकाल सर्रास मुले आत्महत्या करतात, कधी टक्के कमी तर कधी डान्सच्या क्लासला पाठवले नाही म्हणून. ह्या मुलांच्या मानसिकतेचा फायदा घेवून मग निर्माते आपल्या तिजोऱ्या भरतात. आपल्या मुलाने अभ्यासामध्ये प्रगती करावी म्हणून प्रयत्न करणे; दहावी, बारावीच्या महत्वाच्या वर्षी त्याच्यामागे अगदी हात धुवून लागणे गैर आहे? उद्या तुम्हाला चांगले शिकून सुद्धा कदाचित नोकरी मिळणार नाही. पण क्रिकेट खेळून, आणि फोटो काढून तुम्ही तुमचे करियर बनवू शकता, ह्याचे प्रमाण किती टक्के आहे? छंद आणि आवडी ह्या तात्पुरत्या असतात, उद्या त्यात बदल होवू शकतो. पण मिळवलेली डिग्री आयुष्भर साथ करते. आणि frustrations काय फक्त अभ्यास करूनच येत?
अमोल मुजुमदार, मुंबई संघाचा माजी कर्णधार... त्याने क्रिकेट खेळामध्ये एव्हढे यश मिळवून सुद्धा त्याची शेवट पर्यंत निवड समितीने दखल घेतली नाही. ह्या खेळाडूने एक दिवस क्रिकेटचे किट माळ्यावर फेकून देवून क्रिकेटला राम राम ठोकला होता.
मी असे नाही म्हणत कि विद्यार्थ्यांनी आपल्या अंगातील सुप्त गुणांना वाव देवू नये, आपल्या आवडीनिवडी सांभाळू नयेत. पण आधी आपल्यामध्ये खरंच असे काही सुप्त गुण आहेत का, कि पुढे जाऊन आपण त्यामध्ये करियर करू शकू, हे ओळखायला हवे. उगाच आपण गल्ली क्रिकेट खेळतो म्हणजे आपण उद्या क्रिकेटवीर होवू हा, फाजील आत्मविश्वास बाळगण्यात अर्थ नाही. प्रत्येकामध्ये काही न काही खासियत असते, काहीतरी गुण असतात, पण बर्याचदा ते गुण आपल्याला ह्या वयात ओळखता येत नाहीत. ते आधी ओळखा, तोवर आईवडिलांचे ऐकायला काय हरकत आहे?

-मिलिंद कारेकर.

About Heart Attacks

There are other symptoms of an heart  attack besides the pain on the left arm.

One must also be aware of an intense pain on the chin, as well as nausea and lots of sweating, however these symptoms may also occur less frequently.

Note:- There may be NO pain in the chest during a heart attack. The majority of people (about 60%) who had a heart attack during their sleep, did not wake up. However, if it occurs, the chest pain may wake you up from your deep sleep.

If that happens, immediately dissolve two aspirins in your mouth and swallow  them with a bit of water.

Afterwards:
     - Phone  a neighbor or a family member who lives very close by
     - Say "Heart Attack!"
     - Say that you have taken 2 aspirins.
     - Take a seat on a chair or sofa near the front door, and wait for their arrival of friends or family member.
     - Do NOT lie down.

My wishes for you and your family members healthy life......

टिपणी: हा लेख माझा नाही आहे. मला इमेल द्वारे आला होतो आणि आवडला म्हणून मी सर्वांसाठी माझ्या ब्लोग वर पोस्ट केला. याचे सर्व हक्क मूळ मालकाचे आहेत. मूळ मालकाचे नाव माहित नसल्या कारणास्तव पोस्ट केले नाही आहे. मूळ मालकाचे नाव कळाल्याच पोस्ट करण्यात येईल. तरीही मूळ मालकाची पोस्ट बद्दल हरकत असल्यास पोस्ट काढला जाईल. 

कायद्याने रिक्षा आणि टॅक्सी वाले सावरीला नाही म्हणू शकत नाही.

पण आज-काल तर आपल्याला असे वर्गवार अनुभवायला मिळते. बरेचदा आपल्याला त्यंची हाजी-हाजी करावी लागते. पण आता तसे कराची काही गरज नाही. कुठलाही रिक्षा किव्हा टॅक्सी चालक तुमाला, तुम्ही सांगितलेल्य ठिकाणी नेह्ण्यास तयार नसेल. तर त्याच्याशी उजत घालू नका, उगचच तुमचा वेळ वाया जाईल. फक्त त्या गाडीचा नंबर लिहून घ्या आणि ट्राफिक पोलीस वेब साइट वर नोंदणी करा.


तुम्ही Software Engineer आहात का?

मग कोड मधला बग काढा....

##########################################################
#include
< stdio.h >
#define LAST 10


int main()
{
int i, sum = 0;
 
cid:1.3206065475@web46306.mail.sp1.yahoo.com
for ( i = 1; i < = LAST; i++ )
{
sum += i;
}


/*-for-*/
printf("sum = %d\n", sum);
return 0;
}

########################################################## 


Developer ने बघा कसा काढला आहे....

###################################################
#include stdio.h;
#define LAST 10


int main()
{
int i, sum = 0;

/*

cid:2.3206065476@web46306.mail.sp1.yahoo.com
*/
for ( i = 1; i < = LAST; i++ )
{
sum += i;
}


/*-for-*/
printf("sum = %d\n", sum);
return 0;
}
 
########################################################## 


टिपणी: हा लेख माझा नाही आहे. मला इमेल द्वारे आला होतो आणि आवडला म्हणून मी सर्वांसाठी माझ्या ब्लोग वर पोस्ट केला. याचे सर्व हक्क मूळ मालकाचे आहेत. मूळ मालकाचे नाव माहित नसल्या कारणास्तव पोस्ट केले नाही आहे. मूळ मालकाचे नाव कळाल्याच पोस्ट करण्यात येईल. तरीही मूळ मालकाची पोस्ट बद्दल हरकत असल्यास पोस्ट काढला जाईल. 

आपलं जाणं रद्द.....!!


बॉसने सेक्रेटरीला फोन केला, ''एका आठवड्यासाठी आपण बाहेरगावी चाललो आहोत. त्यासाठीची सगळी व्यवस्था कर.''
सेक्रेटरीने नव-याला फोन केला, ''एका आठवड्यासाठी मी बाहेरगावी जाणार आहे बॉसबरोबर.''
नव-याने प्रेयसीला फोन केला, ''एका आठवड्यासाठी माझी बायको बाहेरगावी जाणार आहे. तू माझ्या घरीच राहायला ये.''
प्रेयसीने आपल्या प्रायव्हेट ट्यूशनच्या विद्यार्थ्याला फोन केला, ''मी एका आठवड्यासाठी बाहेर चालले आहे. तुला ट्यूशनला सुट्टी.'' विद्यार्थ्याने बाबांना फोन केला, ''बाबा, माझ्या ट्यूशनला आठवडाभर सुटी आहे. मला कुठेतरी घे‌ऊन चला ना फिरायला.''
बाबांनी त्यांच्या सेक्रेटरीला फोन केला, ''हा आठवडा मी माझ्या मुलाबरोबर घालवणार आहे. बाहेरगावी जाणे रद्द.''
सेक्रेटरीने नव-याला फोन केला, ''बाहेरगावी जाणे रद्द.'' नव-याने प्रेयसीला फोन केला, ''आपली भेट रद्द.''
प्रेयसीने विद्यार्थ्याला फोन केला, ''माझे जाणे कॅन्सल झाले आहे. तुझी ट्यूशन सुरूच राहील.''
विद्यार्थ्याने बाबांना फोन केला, ''ट्यूशन सुरूच राहणार आहे. आपलं जाणं रद्द.''

टिपणी: हा लेख माझा नाही आहे. मला इमेल द्वारे आला होतो आणि आवडला म्हणून मी सर्वांसाठी माझ्या ब्लोग वर पोस्ट केला. याचे सर्व हक्क मूळ मालकाचे आहेत. मूळ मालकाचे नाव माहित नसल्या कारणास्तव पोस्ट केले नाही आहे. मूळ मालकाचे नाव कळाल्याच पोस्ट करण्यात येईल. तरीही मूळ मालकाची पोस्ट बद्दल हरकत असल्यास पोस्ट काढला जाईल. 

सद्गुरूवाचुनी सापडेना सोय.

टिपणी: हा लेख माझा नाही आहे. मला इमेल द्वारे आला होतो आणि आवडला म्हणून मी सर्वांसाठी माझ्या ब्लोग वर पोस्ट केला. याचे सर्व हक्क मूळ मालकाचे आहेत. मूळ मालकाचे नाव माहित नसल्या कारणास्तव पोस्ट केले नाही आहे. मूळ मालकाचे नाव कळाल्याच पोस्ट करण्यात येईल. तरीही मूळ मालकाची पोस्ट बद्दल हरकत असल्यास पोस्ट काढला जाईल.

अमाप सुख

टिपणी: हा लेख माझा नाही आहे. मला इमेल द्वारे आला होतो आणि आवडला म्हणून मी सर्वांसाठी माझ्या ब्लोग वर पोस्ट केला. याचे सर्व हक्क मूळ मालकाचे आहेत. मूळ मालकाचे नाव माहित नसल्या कारणास्तव पोस्ट केले नाही आहे. मूळ मालकाचे नाव कळाल्याच पोस्ट करण्यात येईल. तरीही मूळ मालकाची पोस्ट बद्दल हरकत असल्यास पोस्ट काढला जाईल.

एक मुंगीची कथा....

टिपणी: हा लेख माझा नाही आहे. मला इमेल द्वारे आला होतो आणि आवडला म्हणून मी सर्वांसाठी माझ्या ब्लोग वर पोस्ट केला. याचे सर्व हक्क मूळ मालकाचे आहेत. मूळ मालकाचे नाव माहित नसल्या कारणास्तव पोस्ट केले नाही आहे. मूळ मालकाचे नाव कळाल्याच पोस्ट करण्यात येईल. तरीही मूळ मालकाची पोस्ट बद्दल हरकत असल्यास पोस्ट काढला जाईल.

दूरावा

दूरावा म्हणजे प्रेम...
अन, ऒलावा म्हणजे देखील प्रेम...
दूराव्यात असते आठवण...
अन, ऒलाव्यात असते ती साठवण...

दूराव्यात अनेक भास असतात...
अन, ऒलाव्यात तेच भास खास असतात..
दूरावा असह्य असतॊ...
ऒलावा मात्र हवाहवासा असतॊ...

दूराव्यातही असावा ऒलावा...
पण, ऒलाव्यात असू नये कधीही दूरावा...
दूराव्यात प्रेमाचं घर असतं,
अन, ऒलाव्यात त्याला सजवायचं असतं...

दूरावा तूझ्यात अन माझ्यात असला म्हणून काय झालं?
ऒलाव्यालाही हेवा वाटेल असा आहे आपल्या मनाचा आरसा...

टिपणी: हि कविता माझा नाही आहे. मला इमेल द्वारे आला होतो आणि आवडला म्हणून मी सर्वांसाठी माझ्या ब्लोग वर पोस्ट केला. याचे सर्व हक्क मूळ मालकाचे आहेत. मूळ मालकाचे नाव माहित नसल्या कारणास्तव पोस्ट केले नाही आहे. मूळ मालकाचे नाव कळाल्याच पोस्ट करण्यात येईल. तरीही मूळ मालकाची पोस्ट बद्दल हरकत असल्यास पोस्ट काढला जाईल.