आईचा ६० वा वाढदिवस....

रोहनच्या खादाडी ब्लोग वाचून, प्रेरीत होऊन मी पण खाऊगिरी बद्दल एक पोस्ट टाकावे असे मला वाटेल. वास्तविक माझ्या सौदीच्या शेवटच्या ट्रीपला आईने मला पन्या बाटली भरून दिली. तेव्हा पासून दरवेळी पन्हे पिताना रोहन आणि त्याच्या ब्लोगची आठवण यायची. तेव्हा पासून मला एक तरी खाऊगिरी वर पोस्ट टाकावा असे वाटत होते. अखेर मुहूर्त लागला तो आईच्या ६० व्या वाढदिवसा निमित्त.

वाढदिवस थाटात साजरा करायचा असे माझे मत होते पण बाकी सर्वांचे तसे काही मत नव्हते, आई सहित. तरी मला काय राहवले नाही. घरातल्या-घरात का होईना, आपण साजरा करायचा असे मी ठरवले.

ऐन-मैन घरात ३ माणसे, मग बेत ठरला तो केक आणि पिझा वर.



सुरवात झाली ह्या बर्डीसच्या डच टफेल केक आणि सेंटर सॉफ्ट चॉकलेट नि.

 मग मस्त तव मारली ती या सुप्रीम वेज पिझा,  गार्लीक ब्रेड आणि व्हाईट क्रिमी पास्ता वर.



तसे पाहायला गेल्यास आईने पिझा सोडला तर गार्लिक ब्रेड आणि पास्ता कधीच खाल्ला नव्हता. पिझा पण १-२ वेळाच खाल्ला होता. म्हणूनच मी हा आईचा वाढदिवस जरा वेगळ्या पद्धतीने साजरा करुया असे ठरवले होते. घरातल्या-घरात पण आईला आठवणीत राहील असा.

 

1 comment:

  1. chan, he chote chote aanand aaichya manala jivhala detat............ agdi avismaraniya.......

    ReplyDelete