“गटारी”.......

येत्या मंगळवारी, आषाढ - श्रावण शुक्ल १, शके १९३२ (फिरंगी कालगणने प्रमाणे १० ऑगस्ट २०१०) ला आषाढ अमावस्याम्हणजेच सर्वांच्या परिचयाची आणि अगदी सारेजण जीची आतुरतेने वाट पहाताता अशी "गटारी",
पण ही गटारी म्हणजे काय?,
नुसते दारू पिऊन धुंद होत मांस-मच्छीवर आडवा हात मारणे असा आहे का.......?,
की..,या आषाढ अमावस्येचा आनीखीनही काही दुसरे महत्त्व आहे.!
हे..आपल्याला माहीत आहे का.....? 

गटारीलोळण घेऊन साजरी करायची की पूजा बांधून..?

आषाढी अमावास्या तमसो मा ज्योतिगर्मय, असा संदेश देणारी, मंगलमय अशी मानली जाते...,
आषाढातील अमावास्या. हा दिवस 'दिव्यांची अमावास्या' म्हणून साजरा केला जातो.

या दिवशी दिपपूजा केली जाते. कणिक वापरून केलेले गोडाचे दिवे या दिवशी केले जातात. देशावर काही ठिकाणी बाजरीचेही दिवे केले जातात. दूधा-तुपा सोबत गोडाच्या दिव्यांचा नैवेद्य दाखवला जातो.

आश्विनातील अमावस्या ही दीपावली म्हणून साजरी केली जाते. दिवेच-दिवे लावून त्या सणाचा उत्साह आभाळापर्यंत उसळत असतो, पण नाव दीपावली असले, तरी तो उत्सव दिव्यांचा नसतो.
याउलट आषाढातील अमावस्या ही मात्र दिव्यांची आरास केली जाणारी. दीपपूजन किंवा दीपाराधना यासाठी पाळली जाणारी.
घराघरातल्या सांदी-कोपर्
यात, अडगळीत पडलेले दिवे या दिवशी बाहेर काढले जातात, धुऊन पुसून लख्ख करतात, पाटावर वस्त्र मांडून भोवती रांगोळी काढून त्यावर हे दिवे स्थापन करतात. गंधफुलांनी त्यांची पूजा करतात. दिवा हा प्रकाश रूपाने सूर्याचा प्रतिनिधी, तर ज्वलनाच्या रूपाने अग्नीचा प्रतिनिधी. दीपकाच्या रूपाने दोन्हींची पूजा दिव्याच्या अवसेला होते.
पण गेल्या काही वर्षांत आपण मात्र या अमावस्येला गटारी ठरवून, जणू काही भरपेट मांसाहार आणि मद्यसेवन करून गटारीत लोळण्यासाठीच असलेली अमावस्या असे तिला रूप देऊन टाकले आहे. आषाढी अमावस्येनंतर श्रावण सुरू होतो, त्यामुळे मांसाशन वर्ज्य मानले जाते. पुढच्या महिन्याभरात ते मिळणार नाही, ते आताच वसूल करून घेण्याकडे आपला कल असतो. मांसाहार हा कदाचित आहाराचा अपरिहार्य भाग असेलही; पण मद्यसेवन हा अपरिहार्य भाग कसा असू शकतो.? अतिरिक्त मद्यसेवनाने धुळीस मिळणारी कुटुंबे उदाहरण म्हणून समोर असतात, माणसे गटारीच्या निमित्ताने मद्याच्या बाटल्याच्या बाटल्या कशा रिचवताता नोव्हे....तर कशा रीत्या करतात?

पण गटारी' म्हणजे अशीच असते काय.?
गटारी अमावस्येच्या विधीचे वर्णन जर खरे असेल, तर अशी गटारी आता किती जण पाळतात..?

भारतीय संस्कृती गटारीचे महत्त्व किती जाणते याचे हे उत्तम उदाहरण. गटार अशुद्ध पदार्थ वाहून नेते, गाव स्वच्छ ठेवते, रोगराई दूर सारते, पण शहरे वाढली, गटारे स्वच्छ होईनाशी झाली. गटारे स्वच्छ होण्यापेक्षा ती अशुद्ध होण्याचा वेग अधिक वाढला आणि गटारांमुळे रोगराई वाढू लागली.

आषाढ महिना हा रोगराईचा महिना समजला जातो
..जशी आज आपल्याकडे H1-N1 म्हणजेच स्वाइनफ्लू, मलेरिया, सर्दि-पडसे आदी रोगांच्या महाभयंकर साथिन्चे प्रलय माजले आहे. त्या होऊ नयेत म्हणून पूर्वापार देवी-देवतांची आराधना होई; त्या प्रसन्न व्हाव्यात यासाठी विधी केल्या जात, बळी दिले जात.

ऐवजी, आताच्या प्रगत विज्ञान युगात गटारे स्वच्छ ठेवली, त्यात घाण तुंबू नये अशी व्यवस्था केली, साचलेल्या सांड पाणी अथवा डबक्यांवर औषधी फवारणी केली तर रोगराई आपोआप वाहून जाईल, वेळो-वेळी सरकारी अथवा खाजगी इस्पितळात जाऊन योग्य तपासणी करून घेतली. तर, प्रसन्न आणि निरोगी श्रावण महिन्याचे आगमन होईल. गटारी' ची आठवण त्यासाठी ठेवायची..!

आषाढातली अमावस्या म्हणजे दिवळी अमावस्या, दिव्याची आवसअसे आम्ही म्हणतो. हल्ली त्याला गटारीहे घाणेरडं नाव का दिलं आहे कुणास ठाऊक..! तेव्हा घरातले सर्वच्या सर्व दिवे पितळेचेच असत. त्या दिवशी ते घासूनपुसून लख्ख करायचे. संध्याकाळी दिवेलागणीला ओटीवर गाईच्या शेणानं सारवायचं. कणे-रांगोळी घालून त्यावर पाट ठेवायचा. त्यावर सर्व दिवे ओळीने मांडून त्यांना हळद-कुंकू, अक्षता, फुलं वाहायची. गोडाचा नैवेद्य ठेवायचा. लामण दिव्याने त्या प्रज्वलित केलेल्या सगळ्या दिव्यांना आरती ओवाळायची. आषाढी अमावस्येला दीपपूजेला महत्त्व असतं.

तसंच त्या रात्री व दुपारीसुद्धा जेवणाचा मोठा घाट घातलेला असतो. जावई-लेकी यांना मोठ्या मानानं जेवायला बोलवायचं. मटण, कोंबडी, वडे... वड्यांतही एक गोड वड्यांचा प्रकार असतो. नारळाचं दूध, गूळ यात तांदळाचं पीठ उकडून त्याचे वडे करतात. खुसखुशीत, मस्त! ते मटणाच्या रश्श्यात बुडवून नाही खायचे. गोड असल्यामुळे नुस्तेच गरमगरम हादडायचे.

आषाढात पडणारा धुवांधार पाऊस हवेत सुखद गारवा आणायचा. अशा वेळी तिखट, चमचमीत, झणझणीत मटण, त्याबरोबर गरमागरम टमटमीत फुगलेले वडे म्हणजे पर्वणीच. त्या दिवशी आळीभर, शेजारीपाजारी, मटण-वड्यांचा, तळलेल्या माशांचा वास घमघमत असायचा. म्हणूनच त्याला अखाड तळायचाम्हणत असावेत.

गेल्या वर्षभरात कुणाकडे दुःखद घटना घडल्या असतील, तर त्यांना पुढे घालूनजेवायला बोलवायचे. पुढे घालूनम्हणजे आपण स्वतः त्यांना घ्यायला जायचे. ज्यांच्या घरात काही दुःखद घटना घडतात ते लोक बिचारे कसंतरी उदरभरणकरत असतात. चवीढवीचं, चमचमीत ते कसं जेवणारत्यांचं दुःख काढायलाएक दिवस आपल्या घरी घेऊन यायचं जेवणासाठी. मटण, कोंबडी, वडे, पुर्या व त्यांच्या तोंडी गोडाचाही घास लागावा म्हणून शिरा करायचा. नवरा गेलेला असेल त्या बाईला घरी जाताना साडीचोळी द्यायची. पुरुषांना धोतर, शर्टचा कपडा.
असा हा आमचा आषाढ मास. मनसोक्त मटण, कोंबडी, मासे खाण्याचा. दुसर्या दिवशी श्रावण मास चालू होणार. सोवळंओवळं, उपासतापास, व्रतवैकल्यांचा. रात्रीच सारी ओशट भांडी घासून टाकायची. चुलीला शेणपोतेरं करायचं. स्वयंपाकघर झाडूनझुडून सारवायचं. रात्रीच. झाडू, पोतेरी, हातपुसणी, दूध, पाणी गाळायची फडकी धुवून टाकायची. मटणाच्या जेवणानं पोट जड झालेलं, अनावर सुस्ती आलेली. मटणा-कोंबडीचे विविध प्रकार करून त्यासाठी वाटण- घाटण करून शरीराची दमणूक झालेली; पण तरी सारी कामं रात्रीच उरकून टाकायची.

उद्या येणार्या श्रेवणासाठी, त्याच्या आगत-स्वागतासाठी घरदार, झाडलोट करून स्वच्छ करायचं. मग गणपती, गौर जाईपर्यंत वरणभात, भाजी, कोशिंबिरी, चटण्या, लोणच्याच्या बरण्यांची, पापडांच्या डब्याची झाकणं उघडली जायची. दही, दूध, ताकावर जोर.
आणि गौरी-गणपती गेले रे गेले, की पिशवी घेऊन मासळी व मटण, कोंबडी आणण्यासाठी बाजारात धूम ठोकायची!

टिपणी: हा लेख माझा नाही आहे. मला इमेल द्वारे आला होतो आणि आवडला म्हणून मी सर्वांसाठी माझ्या ब्लोग वर पोस्ट केला. याचे सर्व हक्क मूळ मालकाचे आहेत. मूळ मालकाचे नाव माहित नसल्या कारणास्तव पोस्ट केले नाही आहे. मूळ मालकाचे नाव कळाल्याच पोस्ट करण्यात येईल. तरीही मूळ मालकाची पोस्ट बद्दल हरकत असल्यास पोस्ट काढला जाईल. 

1 comment: