लय भारी पी जे.....


१) मुंबईतला किस्सा ...मंगळवारची सकाळ ..पप्प्या taxi वाल्याला विचारतो..सिद्धीविनायाकला जाणार का ? ..ड्रायवर : हो जाणार कि ........पप्या म्हणतो ......." मग ठीक आहे ...जावा पण परत येताना माझ्या साठी प्रसाद घेऊन या"

२) नवीन जन्माला आलेल्या बाळाला(नवजात अर्भक :P) नर्स विचारते, "बाळा तू
नाश्त्याला काय घेणार ? पोहे की साबुदाण्याची खिचडी ?? ".....................बाळ
म्हणत, " च्यायला, परत पुण्यात च आलो वाटतं !!

३) पुणेरी किस्सा : एक मुलगा कर्वे रोडवरून प्रचंड जोरात गाडी चालवत होता....एक माणूस त्याला म्हणतो ..."काय कर्वे ??".....तो मुलगा गाडी स्लोव करून म्हणतो.." माझे आडनाव कर्वे नाहीये ..." तो माणूस : " मग बापाचा रस्ता असल्यासारखा गाडी का चालवतोस ??????"
 
४) सत्ता सिंग: - डॉक्टर माझ्या स्वप्नात ऊंदीर फुटबॉल खेळतात!!
    डॉक्टर: - ह्या गोळ्या रोज घ्या, तुमचा त्रास बंद होईल.
    सत्ता सिंग: - डॉक्टर, गोळ्या परवा पासून घेतल्या तर चालतील का??
    डॉक्टर: - का??
    सत्ता सिंग: - उद्या उंदरांची फुटबॉल ची फाइनल - मॅच आहे!!!
 
५) गुरुजी स्पेशल: एकदा दोन गुरुजी गप्पा मारत बसलेले असतात........ 
     पहिले: मला टाटा आणि बिर्ला या दोघांची मालमत्ता मिळाली तर मी त्यांच्यापेक्षा जास्त पैसा कमावेन !!.......
    दुसरे: कशाला उगाच फुशारक्या मारता, ते कसं शक्य आहे ?? ...........
    पहिले: का नाही ? सकाळ-संध्याकाळ दोन शिकवण्यासुद्धा घेईन ना !! :D :D
 
६) पप्या : ए गण्या तुला पोहता येतं का ?  
    गण्या : नाही रे ....
    पप्या : शी तुझ्या पेक्षा तो कुत्रा बरा...त्याला तरी पोहता येते.. 
    गण्या : तुला पोहता येतं का ? ...
    पप्या : हो मग .... 
    गण्या : ई अरे .......मग त्या कुत्र्यात आणि तुझ्यात काय फरक ? .
 
७) एकदा एका शाळेवरून विमान चाललेले असते.........पण ते अचानक आहे त्या जागीच थांबते. ......ना पुढे जात....ना इकडे तिकडे....का बरे? ........कारण शाळेमध्ये जन-गण-मन- चालू झालेले असते.......

टिपणी: हा लेख माझा नाही आहे. मला इमेल द्वारे आला होतो आणि आवडला म्हणून मी सर्वांसाठी माझ्या ब्लोग वर पोस्ट केला. याचे सर्व हक्क मूळ मालकाचे आहेत. मूळ मालकाचे नाव माहित नसल्या कारणास्तव पोस्ट केले नाही आहे. मूळ मालकाचे नाव कळाल्याच पोस्ट करण्यात येईल. तरीही मूळ मालकाची पोस्ट बद्दल हरकत असल्यास पोस्ट काढला जाईल. 

9 comments:

  1. धन्यवाद मैथिली.....मजा आली ना...

    ReplyDelete
  2. हा हा हा हा हा हा… शानदार।

    ReplyDelete
  3. धन्यवाद सुरेश.....

    ReplyDelete
  4. मला खूपच आवडले. खरच छान

    ReplyDelete
  5. मला खूपच आवडले. खरच छान

    ReplyDelete
  6. धन्यवाद मेघा....

    ReplyDelete