कोंदिवडे - राजमाची ट्रेकिंग रुटच्या परिसरात झाडांच्या बिया रुजत घालण्याचा

आता पावसाचे आगमन झाले आहे. वृक्ष वाढावे यासाठी झाडांच्या बिया जमिनीत रुजत घालण्यासाठी योग्य मुहुर्त (हंगाम) आहे हा. कोंदिवडे - राजमाची ट्रेकिंग रुटच्या परिसरात झाडांच्या बिया रुजत घालण्याचा कार्यक्रम दिनांक १९, २० जून २०१० रोजी (शनिवार, रविवार) ठरविला आहे. कार्य सिध्दीस नेण्यास वनदेवता समर्थ आहे.
या मंगल कार्यात सहभागी होण्यासाठी सहकुटुंब, सहपरिवार, मित्र मैत्रिणींसह आपण अवश्य यावे.
या मंगल कार्यात आहेर म्हणून झाडांच्या चांगल्या दर्जाच्या बिया (आंबा, जांभूळ, करंज, चिंच, बोर, वगरे) तसेच पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी न गळणारी जुनी भांडी (डबे, बाटल्या, बरण्या, वगैरे) आनंदाने स्वीकारली जातील.
या मंगल कार्यानंतरच्या स्नेहभोजनासाठी आपल्या आवडीचे व इतरांनाही आवडतील असे रुचकर खाद्यपदार्थ व पिण्याचे पाणी बरोबर आणण्यास विसरू नये.
या मंगल कार्याबाबत अधिक माहितीसाठी व आपण येणार आहात हे कळविण्यासाठी भ्रमण ध्वनी : - अमोघ घैसास
09819561606.

1 comment:

  1. प्रथम तुमचं मना पासून खूप खूप अभिनंदन..
    खूपचं कल्पना... कल्पना म्हणण्या पेक्षा आपण ' संकल्पना ' म्हणूयात...
    मला काही करणा मुळे आपला group बरोबर येणा शक्य नाहीये...
    तरी पण मी हे काम आमच्या इकडे करीन...

    ReplyDelete