मुंबई महानगर पालिकेच्या उप-महापौर, समाज सेवक कि स्वसेवक ?

दोन दिवसान पूर्वी मला धूरवाल्याचा आवाज आला, लगेचच मला माझ्या लहानपणीची आठवण आली. माझ्या लहानपणी मी दादरला आजी कडे राहायचो, त्यावेळी बरेचदा धूरवाला यायचा. जेव्हा केव्हा धूरवाला यायचा त्यावेळी आम्ही बहुतेक चाळीतली लहान पोरे त्याच्या मागो-माग धावायचो. आता मी कांदिवलीत आई कडे राहतो आणि इकडे धूरवाल्याचा आवाज कसा? असा आश्चर्यदायक प्रश्न माझ्या मनात आला. कुतूहला पोटी मी घराच्या बाहेर जाऊन चौकशी केली, तेव्हा मला कळले कि ३ दिवसां पूर्वीच मुंबई महानगर पालिकेच्या तत्कालीन उप-महापौर (शैलजा गिरकर) माझ्या बाजूच्या बिल्डिंग मध्ये भाड्याने राहायला आल्या आहेत. हे ऐकून माझ्या तळ पायाची आग मस्तकात गेली. का असे जर विचाराल तर, गेल्या ३० वर्षात तक्रार करून सुद्धा आमच्या बिल्डिंच्या परिसरात कधीही धुराचे औषध मारल्याचे कोणाच्या हि लक्षात नाही. वास्तविक आमच्या बिल्डींगच्या मागेच म्हशींचा गोठा आहे. बरीच वर्षे आम्हाला मच्छरांनचा त्रास आहे. पण उप-महापौर राहायला आल्या-आल्या ३ दिवसांच्या आताच धुराचे औषध मारण्यात आले. महानगर पालिकेच्या हलकट स्वभावाला अनुसरून धुराचे औषध मारण्याचे काम फक्त त्यांच्याच बिल्डिंग पर्येंत मर्यादित होते. काय म्हणाव, या आपणच निवडून दिलेल्या लोक प्रतिनिधींना. थोडी सुद्धा लाज किंवा शरम वाटत नाही यांना? वास्तविक आमची बिल्डिंग आणि त्यांची बिल्डिंग एकदम बाजू-बाजूला आहे आणि दोन्ही बिल्डिंगचा तट पण एकाच आहे. एवढ जवळ असून सुद्धा त्यांनी आमच्या बिल्डिंग मध्ये धुराचे औषध मारले नाही. काय निगरगट्ट आणि लाज कोळून प्यालेली माणसे आहेत हि, सर्व आजू-बाजूचा परिसर सोडून फक्त उप-महापौर भाड्याने राहायला आलेल्या बिल्डिंग मधेच धुराचे औषध मारले. यातून आपण काय समजावे, कि या मुंबईत फक्त महापौर आणि उप-महापौरानच्या परिवाराला मच्छर चावतात का? बाकी सर्व जनतेला राखीव वर्ग म्हणून वगळण्यात आले आहे का?

आपण सर्व मिळून या "ना-लायक" लोक प्रतिनिधींना खडसावून कळवले पाहिजे कि, आम्ही हि या मुंबईचे रहिवाशी आहोत आणि गेली कैक वर्षे आम्हला हि मच्छर चावत आहे. या मच्छरान पासून आम्हाला राखीव अधिकार मिळालेले नाही आहेत.

माझे सर्व वाचकांना आव्हान आहे, कि हि लाजिरवाणी गोष्ट जास्तीत-जास्त लोकां पर्येंत पोहोचवावी.

No comments:

Post a Comment