आमच्या घरच्या गणपतीच्या फोटोंची सर्वत्र चोरी.

सालाबाद प्रमाणे २००८ सालच्या आमच्या घरच्या गणपतीला माझा मित्र प्रशांत आचरेकर आला होता. आम्ही घराच्या गणपतीला आरास बरीच वर्षी फुलाचीच करीत आलो आहोत. २००८ साली प्रशांतने नवीन सोनीच्या कॅमेरा घेतला होतो आणि गणपतीला येताना घेऊन आला होता फोटो काढण्यासाठी. त्याने काढलेले हे काही फोटो.


 http://www.flickr.com/photos/acharekar/2826793531/in/set-72157607393341826/


http://www.flickr.com/photos/acharekar/2826792387/in/set-72157607393341826/

http://www.flickr.com/photos/acharekar/2826791515/in/set-72157607393341826/

http://www.flickr.com/photos/acharekar/2827626110/in/set-72157607393341826/

http://www.flickr.com/photos/acharekar/2826789375/in/set-72157607393341826/

वरील सर्व फोटो प्रशांतने फ्लिकर टाकले आहेत. २००८ नंतर दरवर्षी प्रशांत मला सांगायचा, अरे तुझ्या घरच्या गणपतीला आता एवढे हजार व्हुव झाले आणि वगैरे-वगैरे. प्रशांत कडून हे ऐकून मला फार बरे वाटायचे आणि मी हे सर्व आईला पण सांगायचो, कि प्रशांत ने काढलेल्या आपल्या गणपतीचे फोटो इंटरनेटवर बरेच जण पाहत आहेत. हल्ली तर प्रशांत मला बरेचदा सांगायचा कि गुगल वर "Flower Ganpati Decoration" जर इमेज सर्च केले तर पहिल्या पानावर तुझ्या घरचा गणपतीचा फोटो येतो. हे सर्व ऐकून खरो-खरच आम्हा सर्वन फार बरे वाटायचे. या वरून गणपतीची सेवा पर्यावरणाला सांभाळून करीत असल्याचे समाधान हि वाटते.

पण गेल्या २ महिन्या पूर्वी फेसबुक वर वरच्या फोटोन पैकी २ फोटो पाहायला मिळाले. प्रथमदर्शनी जरा बरे वाटले, पण नंतर थोडासा राग पण आला. कारण हे फोटो प्रशांतच्या किवा माझ्या परवानगी शिवाय फेसबुकच्या Maharashtracha Ganeshostav (महाराष्ट्राचा गणेशोस्तव) या ग्रुप मध्ये त्यांनी टाकले होते. किंबहुना मी या बद्दल माझी ना हरकत दर्शवून सुद्धा या बद्दल त्यांनी दखल घेतलेली अध्यापही दिसत नाही आहे.

आणि याहून सर्वात मोठा कहर पाहायला मिळाला तो १८ सप्टेंबर २०१२ला टीवीवर, ए.बी.पी.माझा ने महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या सोबतीने घरगुती गणपती इको फ्रेंडली सजावट स्पर्धेच्या जाहिरातीत वरच्या पैकी एक फोटो वापरला होता. हे पाहून पण आम्हा सर्वाना फारच आनंद झाला, कि आमच्या घरचा गणपतीचा फोटो आता टीवीवर झळकत आहे. पण मला मात्र हे पाहून फार राग आला. कारण आमच्या परवानगी शिवाय आमच्या घरच्या गणपतीचा फोटो सर्वत्र झळकतो आहे.

म्हणून मी ए.बी.पी.माझाचे (Anand Latwal  |  AVP – Admin & Regulatory Affairs) यांना आमच्या घरच्या गणपतीचा फोटो, आमच्या परवानगी शिवाय जाहिरातीत वापरल्या बद्दल ना हरकत इमेल करून दर्शवली. पण मी आनंद लाटवाल यांचे मनोभावे आभार मानतो, कि त्यांनी माझ्या ना हरकत तक्रारीची पूर्ण पणे दाखल घेत या जाहिरातीत आमच्या गणपतीचा फोटो वापरल्या बद्दल माझे नाव जाहिरातीत फोटो पुढे मांडले आहे. 

हि पहा ती जाहिरात...


आणि या जाहिरातीत त्यांनी वापरलेला फोटो २ वेगळ्या फ्रेम मध्ये. खालील प्रमाणे...
या फोटोच्या चोरी बद्दल अजून एक किस्सा मला सांगायला आवडेल. आमच्या घरा जवळच एक फुलांचा बुके बनवणारा आहे आणि गणपतीच्या वेळी तो गणपतीच्या फुलाची आरास हि करून देतो. माझ्या आईने सहजच त्याला त्याच्या कडच्या आरसाची किंमत विचारली आणि आमच्या कडे सजावट करायला किती पैसे घेशील असे हि विचारले. त्याने माझ्या आईला त्याच्या कडचा एक फोटोंचा अल्बम काढून दाखवला आणि मी तुम्हाला असे करून देईन असे सांगू लागला आणि सांगताना आमच्या घरच्या गणपतीचा फोटो माझ्या आईला दाखवू लागला. माझ्या आईने त्याला विचारले कि, हे तू केलेस का? तर तो धड-धाडीत खोट बोला "हा मीच केले". माझ्या आईने त्याला सांगितले कि हा आमच्याच घरच्या गणपतीचा फोटो आहे आणि हि सर्व आरास आमच्या माणसां कडून केली जाते. त्याच्या कडे हा फोटो कसा आला हे त्याला माझ्या आईने विचारले असता तो बोलला कि 'महावीर नगर कांदिवली मधल्या एका स्टुडियो मधून मिळाला'.

आम्ही आमच्या या गणपतीचे अजून पर्येंत कुठल्याही ठिकाणी फोटो स्पर्धेसाठी पाठवले नाही आहे. किंबहुना बर्याच जणांनी आम्हाला गणपतीच्या सजावटीचे फोटो स्पर्धेत टाका असे सांगत असतात. पण मला देवाची स्पर्धा, त्याच व्यवसाहिकरण  किंवा प्रसिद्धीकरण करायला आवडत नाही, म्हणूनच अजून पर्येंत आमच्या पैकी कोणीही यात सहभागी झाले नाही आहोत. पण आता मात्र मला असे वाटले कि या चोरीला गेलेल्या फोटोच्या मुळे थोड्या प्रमाणात का होईना आमच्या घरच्या गणपतीचे प्रसिद्धीकरण झाले आहे. कारण आता आम्हाला बरेच जण सांगतात तुमच्या घरचा गणपतीचा फोटो टीवीवर पाहिला आणि माझ्या ऑफिस मध्ये तर हा चर्चेचा विषय झाला होता "अमेय तुझ्या घरच्या गणपतीचा आम्ही टीवीवर फोटो पाहिला हा...!!!".

आता मी तरी काय करणार मला देवाची प्रसिद्धी आवडत नाही पण बहुदा गणपतीला मात्र त्याची प्रसिद्धी आवडत असावी. म्हणूनच चोरीच्या मार्गाने का होईना तो थोडासा प्रसिद्ध झालाच.