टेकनोलॉजी

पहा टेकनोलॉजीने आपल्याला किती बदलले आहे.

टिपणी: हा फोटो माझा नाही आहे. मला इमेल द्वारे आला होतो आणि आवडला म्हणून मी सर्वांसाठी माझ्या ब्लोग वर पोस्ट केला. याचे सर्व हक्क मूळ मालकाचे आहेत. मूळ मालकाचे नाव माहित नसल्या कारणास्तव पोस्ट केले नाही आहे. मूळ मालकाचे नाव कळाल्याच पोस्ट करण्यात येईल. तरीही मूळ मालकाची पोस्ट बद्दल हरकत असल्यास पोस्ट काढला जाईल.

सबको मिलेगा....

टिपणी: हा फोटो माझा नाही आहे. मला इमेल द्वारे आला होतो आणि आवडला म्हणून मी सर्वांसाठी माझ्या ब्लोग वर पोस्ट केला. याचे सर्व हक्क मूळ मालकाचे आहेत. मूळ मालकाचे नाव माहित नसल्या कारणास्तव पोस्ट केले नाही आहे. मूळ मालकाचे नाव कळाल्याच पोस्ट करण्यात येईल. तरीही मूळ मालकाची पोस्ट बद्दल हरकत असल्यास पोस्ट काढला जाईल.

अतिभयानक पीजे


एक बाई दुसर्‍या बाईला विचारले
प.बा.:तुम्ही गहू कसा आणला? दु.बा.:पिशवीतून आणला
प.बा.:तसं नाही हो, कोणत्या भावाने आणला? दु.बा: चुलत भावाने आणला
--------------------------------
गावकरी: १० रुपयाच्या रिचार्ज वर किती टॉकटाईम मिळेल?दुकानदारः ७ रुपये..
गावकरी: ठीक आहे राहिलेल्या ३ रुपयाची चॉकलेटं द्या...
------------------------------
-
भुगोलाचे शिक्षक: सांगा पाहू, महाराष्ट्रात सर्वात जास्तं पाउस कुठे पडतो? बंड्या: जमिनीवर..
------------------------------
हॉलीवुड चित्रपटाची मराठी नावे
DIE ANOTHER DAY=
नंतर कधीतरी मर
SUPERMAN=
लई भारी मानुस
SCORPION KING=
तात्या विंचू
THE MUMMY =
आई
THE MUMMY RETURNS=
आई परत आली..
------------------------------
----
बंड्या: आई ..आई, बाहेर एक मिशीवाला आला आहे...!
आई: त्याला सांग, आम्हाला नकोत, बाबांच्या आधीच आहेत...
------------------------------
-------
एकदा धीरुभाई अंबानी स्वर्गातून फोनवर: अरे अनिल बेटा आपला रिलायन्स ईंडिया मोबाईल चा बिझनेस काय म्हणतोय? अनिल: पापा तुमचा आवाज नीट येत नाहिये माझ्या एअरटेल वर फोन करा..
------------------------------
बॉ.फ्रे. आणि ग.फ्रे. हॉटेलात जातात
बॉ.फ्रे.: काय घेणार? ग.फ्रे.: (लाडात येउन) तू घेशील तेच..
बॉ.फ्रे.: ठीक आहे, वेटर, दोन मिसळ-पाव आणि दोन चहा आण
ग.फ्रे.: (परत लाडात येउन) वेटर, मला पण दोन मिसळ-पाव आणि दोन चहा !!
------------------------------
मुलगा: चल, कुठेतरी एकांतात जाउया..
मुलगी: तू काहीतरी चावटपणा करशील..
मुलगा: अजिबात नाही..
मुलगी: मग काय उपयोग .. जाउ दे
------------------------------
नवरी : आपल्या लग्नाच्या पंचविसाव्या वाढदिवसाला तू मला कुठे नेशील ?नवरा : अफ्रीकन सफारीला
नवरी : आणि लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसाला ?नवरा : मी तुला अफ्रीकेहून परत आणेन

टिपणी: हा लेख माझा नाही आहे. मला इमेल द्वारे आला होतो आणि आवडला म्हणून मी सर्वांसाठी माझ्या ब्लोग वर पोस्ट केला. याचे सर्व हक्क मूळ मालकाचे आहेत. मूळ मालकाचे नाव माहित नसल्या कारणास्तव पोस्ट केले नाही आहे. मूळ मालकाचे नाव कळाल्याच पोस्ट करण्यात येईल. तरीही मूळ मालकाची पोस्ट बद्दल हरकत असल्यास पोस्ट काढला जाईल. 

स्वामी विवेकानंद आणि बुद्धिमत्ता.....


जेव्हा स्वामी विवेकानंद अमेरिकेत गेले होते, तेव्हा त्यांना एका बाईने विचारले. माझ्याशी लग्न करणार का?
स्वामीजिनी त्या बाईला विचारले, पण तुम्हाला हा प्रश्न का विचारावासा वाटला.
त्या बाईने उत्तर दिले कि मी तुमच्या बुद्धिमत्तेने आकर्षित झाले आहे. मला तुमच्या सारखे बुद्धिमान मुल हवे आहे. म्हणून तिने स्वामीजींना विचारले कि तुम्ही माझ्याशी लग्न करून तुमच्या सारखे बुद्धिमान मुल मला द्याल का?
स्वामीजी म्हणाले, तुम्ही माझ्या बुद्धिमत्तेला आकर्षित झालात यात काही हरकत नाही आणि मी तुमची अभिलाषा समझतो. लग्न करून मुल जन्माला देणे आणि ते मुल बुद्धिमान असेल कि नाही, हे समझायला फार वेळ लागणार आणि त्याची काही खात्री नाही.
त्यापेक्षा, तुमची तीव्र इच्छा लगेचच पूर्ण व्हायला मी एक युक्ती सांगतो आणि यात खात्री आहे.
मलाच तुम्ही मुल बनवून घ्या. म्हणजे तुम्ही माझी आई व्हाल. आता माझ्या सारखा बुद्धिमान मुलगा असण्याची तुमची इच्छा पूर्ण झाली कि नाही.
त्या बाई शब्दहीन होत्या.......!!!!!

तात्पर्य:- आपल्याला अनपेक्षीत प्रश्न कुठल्या हि वेळी येऊ शकतात, पण आपण तो प्रसंग कशा प्रकारे हाताळतो...ते महत्वाचे आहे...!!!


टिपणी: मला हि गोष्ट इमेल द्वारे आला होतो इंग्रागी मध्ये आणि आवडला म्हणून मी सर्वांसाठी मराठी अनुवादन करून माझ्या ब्लोग वर पोस्ट केला. याचे सर्व हक्क मूळ मालकाचे आहेत. मूळ मालकाचे नाव माहित नसल्या कारणास्तव पोस्ट केले नाही आहे. मूळ मालकाचे नाव कळाल्याच पोस्ट करण्यात येईल. तरीही मूळ मालकाची पोस्ट बद्दल हरकत असल्यास पोस्ट काढला जाईल.

महाराष्ट्राचा ५० वा वाढदिवस....

१ मे २०१०, महाराष्ट्र राज्याला ५० वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने महाराष्ट्र सरकारने मरीन ड्राइव येथे लेझर शो आयोजित केला होता. हे मी सकाळी पेपर मध्ये वाचले आणि त्याच वेळी ठरवले कि आपण हे पाहायला जायचे. मग मी, अक्षता आणि सिध्देश संध्याकाळी शिवाजी पार्कात भेटून मरीन ड्राइव गेलो. पोहोचलो तेव्हा शो सुरु झाला होता. तसी फार गर्दी नव्हती म्हणून शो व्यवस्थित पाहायला मिळाला. तसा लेझर शो काय फार चांगला नव्हता पण ठीक होता. म्हणून मी फोटोग्राफी करत राहिलो.


लेझर शो पाहता पाहता मधेच फटाके सुरु झाले आणि माझे तर हा फोटो काढू कि तो काढू असे झाले. पण मस्त वाटत होते. चारी बाजूने फटाके आकाशात उडत होते. मस्त आकाश रंगून गेले होते.
आणि थोड्या वेळातच समुद्रातून हि फटाके आकाशात उडायला लागले.

मस्त आतिश बाजी पाहून आम्ही सी.एस.टी स्टेशन कडे गेलो. कारण तेथे सी.एस.टी स्टेशन आणि बी.एम.सी ऑफिस च्या इमारतीवर रोषणाई करणार होते. पण सी.एस.टी स्टेशन ची रोषणाई काही खास नव्हती. पण बी.एम.सी ऑफिस च्या इमारतीवरची रोषणाई मस्त वाटत होती. इकडे हि मी काही फोटो काढले.



आता एवढी दुनियादारी केली आणि भूख लागली म्हणून खाऊगिरी करायचे ठरले. मग काय बाजूलाच कॅनन होते. घुसलो मग गर्दीत, मस्त पाव भाजी हाणली आणि शेजारीच कला खट्टा पियालो.













 सर्व फोटो पहायचे असल्यास क्लिक करा.

आईचा ६० वा वाढदिवस....

रोहनच्या खादाडी ब्लोग वाचून, प्रेरीत होऊन मी पण खाऊगिरी बद्दल एक पोस्ट टाकावे असे मला वाटेल. वास्तविक माझ्या सौदीच्या शेवटच्या ट्रीपला आईने मला पन्या बाटली भरून दिली. तेव्हा पासून दरवेळी पन्हे पिताना रोहन आणि त्याच्या ब्लोगची आठवण यायची. तेव्हा पासून मला एक तरी खाऊगिरी वर पोस्ट टाकावा असे वाटत होते. अखेर मुहूर्त लागला तो आईच्या ६० व्या वाढदिवसा निमित्त.

वाढदिवस थाटात साजरा करायचा असे माझे मत होते पण बाकी सर्वांचे तसे काही मत नव्हते, आई सहित. तरी मला काय राहवले नाही. घरातल्या-घरात का होईना, आपण साजरा करायचा असे मी ठरवले.

ऐन-मैन घरात ३ माणसे, मग बेत ठरला तो केक आणि पिझा वर.



सुरवात झाली ह्या बर्डीसच्या डच टफेल केक आणि सेंटर सॉफ्ट चॉकलेट नि.

 मग मस्त तव मारली ती या सुप्रीम वेज पिझा,  गार्लीक ब्रेड आणि व्हाईट क्रिमी पास्ता वर.



तसे पाहायला गेल्यास आईने पिझा सोडला तर गार्लिक ब्रेड आणि पास्ता कधीच खाल्ला नव्हता. पिझा पण १-२ वेळाच खाल्ला होता. म्हणूनच मी हा आईचा वाढदिवस जरा वेगळ्या पद्धतीने साजरा करुया असे ठरवले होते. घरातल्या-घरात पण आईला आठवणीत राहील असा.