स्वामी विवेकानंद आणि बुद्धिमत्ता.....


जेव्हा स्वामी विवेकानंद अमेरिकेत गेले होते, तेव्हा त्यांना एका बाईने विचारले. माझ्याशी लग्न करणार का?
स्वामीजिनी त्या बाईला विचारले, पण तुम्हाला हा प्रश्न का विचारावासा वाटला.
त्या बाईने उत्तर दिले कि मी तुमच्या बुद्धिमत्तेने आकर्षित झाले आहे. मला तुमच्या सारखे बुद्धिमान मुल हवे आहे. म्हणून तिने स्वामीजींना विचारले कि तुम्ही माझ्याशी लग्न करून तुमच्या सारखे बुद्धिमान मुल मला द्याल का?
स्वामीजी म्हणाले, तुम्ही माझ्या बुद्धिमत्तेला आकर्षित झालात यात काही हरकत नाही आणि मी तुमची अभिलाषा समझतो. लग्न करून मुल जन्माला देणे आणि ते मुल बुद्धिमान असेल कि नाही, हे समझायला फार वेळ लागणार आणि त्याची काही खात्री नाही.
त्यापेक्षा, तुमची तीव्र इच्छा लगेचच पूर्ण व्हायला मी एक युक्ती सांगतो आणि यात खात्री आहे.
मलाच तुम्ही मुल बनवून घ्या. म्हणजे तुम्ही माझी आई व्हाल. आता माझ्या सारखा बुद्धिमान मुलगा असण्याची तुमची इच्छा पूर्ण झाली कि नाही.
त्या बाई शब्दहीन होत्या.......!!!!!

तात्पर्य:- आपल्याला अनपेक्षीत प्रश्न कुठल्या हि वेळी येऊ शकतात, पण आपण तो प्रसंग कशा प्रकारे हाताळतो...ते महत्वाचे आहे...!!!


टिपणी: मला हि गोष्ट इमेल द्वारे आला होतो इंग्रागी मध्ये आणि आवडला म्हणून मी सर्वांसाठी मराठी अनुवादन करून माझ्या ब्लोग वर पोस्ट केला. याचे सर्व हक्क मूळ मालकाचे आहेत. मूळ मालकाचे नाव माहित नसल्या कारणास्तव पोस्ट केले नाही आहे. मूळ मालकाचे नाव कळाल्याच पोस्ट करण्यात येईल. तरीही मूळ मालकाची पोस्ट बद्दल हरकत असल्यास पोस्ट काढला जाईल.

No comments:

Post a Comment