लेझर शो पाहता पाहता मधेच फटाके सुरु झाले आणि माझे तर हा फोटो काढू कि तो काढू असे झाले. पण मस्त वाटत होते. चारी बाजूने फटाके आकाशात उडत होते. मस्त आकाश रंगून गेले होते.
आणि थोड्या वेळातच समुद्रातून हि फटाके आकाशात उडायला लागले.
मस्त आतिश बाजी पाहून आम्ही सी.एस.टी स्टेशन कडे गेलो. कारण तेथे सी.एस.टी स्टेशन आणि बी.एम.सी ऑफिस च्या इमारतीवर रोषणाई करणार होते. पण सी.एस.टी स्टेशन ची रोषणाई काही खास नव्हती. पण बी.एम.सी ऑफिस च्या इमारतीवरची रोषणाई मस्त वाटत होती. इकडे हि मी काही फोटो काढले.
आता एवढी दुनियादारी केली आणि भूख लागली म्हणून खाऊगिरी करायचे ठरले. मग काय बाजूलाच कॅनन होते. घुसलो मग गर्दीत, मस्त पाव भाजी हाणली आणि शेजारीच कला खट्टा पियालो.
सर्व फोटो पहायचे असल्यास क्लिक करा.
सर्व फोटो पहायचे असल्यास क्लिक करा.
निर्लज्ज सरकारचे निर्ल्लज्ज चाळे. मुंबईच्या बाहेर मराठ्वाडा, विदर्भात दररोज चार ते दहा तास विद्युत कपात असतांना ही अशी रोषणाई करण्याची गरज काय होती? असे काय मोठे दिवे लावले ह्यांनी पन्नास वर्षात? उलट महाराष्ट्राची पुर्ण वाट लावलेली आहे. असो..
ReplyDeleteमहेंद्र - तुमच्या मता वर मी १००% सहमत आहे. माझे पण थोड्या फार फरकाने असेच मत आहे. सरकारला साजरा करायला काय जाते. पण अशा बऱ्याच ठिकाणी विजेचा वायफळ वापर केला जात होता, जात आहे आणि जात राहणार. उदारणार्थ रस्त्या बाजू लगत असलेल्या जाहिरात फलकांवर १२-१४ तास विजेच्या दिव्यांचा मारा असतो आणि भारतातला सर्वात प्रसिद्ध खेळ क्रिकेट, याची मालिका (आय. पी. एल) चे सर्व सामने विद्युत रोषणाई खाली खेळण्यात आले. या सर्वात कईक मेगा-वॅट वीज वापरली असेल. याचा हि आपण सर्वानी विचार केला पाहिजे.
ReplyDelete