बॉसने सेक्रेटरीला फोन केला, ''एका आठवड्यासाठी आपण बाहेरगावी चाललो आहोत. त्यासाठीची सगळी व्यवस्था कर.''
सेक्रेटरीने नव-याला फोन केला, ''एका आठवड्यासाठी मी बाहेरगावी जाणार आहे बॉसबरोबर.''
नव-याने प्रेयसीला फोन केला, ''एका आठवड्यासाठी माझी बायको बाहेरगावी जाणार आहे. तू माझ्या घरीच राहायला ये.''
प्रेयसीने आपल्या प्रायव्हेट ट्यूशनच्या विद्यार्थ्याला फोन केला, ''मी एका आठवड्यासाठी बाहेर चालले आहे. तुला ट्यूशनला सुट्टी.'' विद्यार्थ्याने बाबांना फोन केला, ''बाबा, माझ्या ट्यूशनला आठवडाभर सुटी आहे. मला कुठेतरी घेऊन चला ना फिरायला.''
बाबांनी त्यांच्या सेक्रेटरीला फोन केला, ''हा आठवडा मी माझ्या मुलाबरोबर घालवणार आहे. बाहेरगावी जाणे रद्द.''
सेक्रेटरीने नव-याला फोन केला, ''बाहेरगावी जाणे रद्द.'' नव-याने प्रेयसीला फोन केला, ''आपली भेट रद्द.''
प्रेयसीने विद्यार्थ्याला फोन केला, ''माझे जाणे कॅन्सल झाले आहे. तुझी ट्यूशन सुरूच राहील.''
विद्यार्थ्याने बाबांना फोन केला, ''ट्यूशन सुरूच राहणार आहे. आपलं जाणं रद्द.''
टिपणी: हा लेख माझा नाही आहे. मला इमेल द्वारे आला होतो आणि आवडला म्हणून मी सर्वांसाठी माझ्या ब्लोग वर पोस्ट केला. याचे सर्व हक्क मूळ मालकाचे आहेत. मूळ मालकाचे नाव माहित नसल्या कारणास्तव पोस्ट केले नाही आहे. मूळ मालकाचे नाव कळाल्याच पोस्ट करण्यात येईल. तरीही मूळ मालकाची पोस्ट बद्दल हरकत असल्यास पोस्ट काढला जाईल.

एक नंबर
ReplyDeleteधन्यवाद नागेश...
ReplyDeleteno 1.. mi pan hech mhanato :)
ReplyDeleteधन्यवाद विजय....
ReplyDelete