- आमचे येथे बर्गर व परकर मिळतील. तसेच बाहेरील खाद्य पदार्थांस एक रुपयात सॉस लावून मिळेल.
- ह्या ब्रांचचे मालक इथेच जेवतात (टीप: मालकांच्या वजनाची चौकशी करू नये)
- दोन माणसात तोंड पुसायचे तीन कागद मिळतील. नंतर ज्यादा आकार पडेल.
- कारणाशिवाय बसू नये. कारण काढूनही बसू नये. फक्त खाण्यासाठीच बसायची सोय आहे.
- टि.व्ही. चालू ठेवायचा किंवा नाही हा निर्णय व्यवस्थापनाचा आहे. तरी बंद टिव्हीचा आरशासारखा उपयोग करून केस वगैरे विंचरू नयेत.
- टि.व्ही. चालू असेल तरी फार पहात बसू नये. हे खाद्यगृह आहे प्रेक्षागृह नव्हे.
- कृपया फ्रेंच फ्राईज मोजून घ्यावेत. नंतर तक्रार चालणार नाही. (लहान साईज: ४६ फ्राईज, मध्यम : २७ फ्राईज, मोठा: १७ फ्राईज)
- गि-हाईकांचा संतोष हेच आमचे ध्येय. (व्यवसायाच्या वेळा : ११ ते १ व ४ ते ८ / तक्रारीची वेळ : ११ ते ११.०५)
- पहिल्या दहा मिंटात ऑर्डर मिळाली नाही तर पुढच्या दहा मिंटात मिळेल. पैसे परत मिळणार नाहीत.
- कृपया ड्राईव थ्रू च्या खिडकीवरील मुलीशी गप्पा मारू नयेत.
- विनाकारण सॉस मागू नये. टोमाटो फुकट मिळत नाहीत.
- शीतपेयाच्या ग्लासच्या झाकणास भोक पडलेले नाही तर चोखनळी (स्ट्रॉ) साठी पाडलेले आहे. ते बदलून मिळणार नाही ह्याची नोंद घ्यावी.
- दुस-या कंपनीच्या बरगरच्या किमती इथे सांगू नयेत.
- उरलेले अन्न नेण्यास घरून डबा आणावा. कागदी वा प्लास्टिक पिशवी मिळणार नाही.
- हॅपी मिलची खेळणी संपलेली आहेत (ही पाटी कायमची का आहे ते विचारू नये)
- आमची कुठेही शाखा आहे ! (पण दुस-या शाखेच्या तक्रारी इथे सांगू नयेत)
- कृपया बाहेरील आमच्या जोकरच्या पुतळ्याशी फार लगट करू नये. सभ्यपणे फोटो काढावेत.
- शीतपेय संपल्यावर ग्लास टाकून द्यावा. चोखनळीने विचित्र आवाज करत बसू नये.
टिपणी: हा लेख माझा नाही आहे. मला इमेल द्वारे आला होतो आणि आवडला म्हणून मी सर्वांसाठी माझ्या ब्लोग वर पोस्ट केला. याचे सर्व हक्क मूळ मालकाचे आहेत. मूळ मालकाचे नाव माहित नसल्या कारणास्तव पोस्ट केले नाही आहे. मूळ मालकाचे नाव कळाल्याच पोस्ट करण्यात येईल. तरीही मूळ मालकाची पोस्ट बद्दल हरकत असल्यास पोस्ट काढला जाईल.
http://rahulphatak.blogspot.com/2010/12/blog-post.html
ReplyDeleteलेखक राफा उर्फ राहुल फाटक.
Chan aahe..
ReplyDeletetoo good, thanks for sharing
ReplyDeleteANiket
bhannat re
ReplyDelete