Social networking मध्ये अडकलेल्या माझ्या मित्रांनो.....

मित्रांचे कट्टे आजकाल ओसंच पडतात..
कुणी
 'orkut' वर तर कुणी 'Facebook' वर जमतात..प्रत्यक्ष भेटीत सगळेच बुचकळयात पडतात..
कारण सगळे विषय
'chat' वरच संपलेले असतात..मग 'chat' वर भेटूच " याचंPromise होतं..
आणि संभाषणातून 
'Sign out' के लं जातं. ..
'
लाल' 'हिरव्यादिव्यांच्या गर्दित मग हरवायला होतं...
घट्ट पकडलेलया हातांनाही सैल सुटायला होतं
..
'Available' 
आणि'Busy' मध्ये
प्रतेकाचा
 status घुटमळत राहतो...
आपणहून
 add केलेल्या मित्रपासून लापन्यकारिता
'Invisible'
चा आडोसा घेतला जातो..ताप आल्याच आजकाल आईच्या आधी'Facebook' ला कळत..
औषध पेक्षा
 'Take Care' च्या डोसेजनीच तापालाही पळायला होतं..मनातलं सगळं 'Facebook' वर ओकायची
मैत्रीत गरजच का असावी
?
नात्यांना धरून ठेवायला

'Net''
ची जाळीच का असावी?कधीतरी वाटतं पुन्हा कट्ट्यावर जमावं..
'chat' 
ला गप्पानी आणि 'Smile' ना हस्यानी replace करावं..शब्दापेक्षा सोबतीचं सामर्थ्य जास्त असतं
मैतीचं खरं समाधान खंद्यावरच्या हातात असतं
....
...............
एक मित्र
चला तर पूर्वी चे दिवस पुन्हा अनुभावुया ,
मैत्रीला
 technology पासून जपून ठेवुया ......





टिपणी: हा लेख माझा नाही आहे. मला इमेल द्वारे आला होतो आणि आवडला म्हणून मी सर्वांसाठी माझ्या ब्लोग वर पोस्ट केला. याचे सर्व हक्क मूळ मालकाचे आहेत. मूळ मालकाचे नाव माहित नसल्या कारणास्तव पोस्ट केले नाही आहे. मूळ मालकाचे नाव कळाल्याच पोस्ट करण्यात येईल. तरीही मूळ मालकाची पोस्ट बद्दल हरकत असल्यास पोस्ट काढला जाईल.

विंबल्डन २०११ च्या टिकीट किमती...

मी या वर्षीच्या विंबल्डन मधली एक तरी मॅच पहावी अशी इच्छा बाळगून होतो. कारण मी या वर्षीच्या जून - जुलै २ महिने अनायसे लंडन मध्ये ऑफिसच्या कामासाठी आहे. आजच कळले कि विंबल्डन १०-१२ दिवसावर आले आहे, म्हणून मी विंबल्डन २०११ च्या टिकीट मिळतात का पाहायला लागलो. टिकीट मिळतायत पण तिकिटांच्या किमती पाहून माझे डोळे भिर-भिरले आणि मी विंबल्डन ची मॅच पहायचा विचारच सोडला. 

विंबल्डन २०११ च्या टिकीट किमती खालील प्रमाणे......


अशक्य आहे या किमती माझ्या साठी. आयुष्यात इच्छांना पण मुरड घालावी लागते, त्याचे हे एक उदारण. 

चला मग आता विंबल्डन २०११ टी.वि. वर किव्हा ऑनलाइन पाहूया.....