कविता माझ्या रडू लागल्या
भावनांना मरण आलं
आगीत तुझ्या विरहाच्या
सारं काही जळून खाक झालं
जमतील सारे जेव्हा
चिता माझी रचण्यासाठी
येशील ना तेव्हा तुही
राख माझी वेचण्यासाठी
राख माझी वेचताना
जर तुला का रडू आलं
तर दोन थेंब तुझ्या अश्रूंचे
माझ्या राखेवरती गळू देत
मरण माझं वाया गेलं नाही
हे मलासुद्धा कळू देत...
डोळ्यातलं पाणी आटण्या आधी
श्वासातील गर्म उसासे थंड होण्या आधी
ह्रदयातील आक्रोश थांबण्या आधी
शरीरातील चेतना बंद होण्या आधी
चितेला आग लागण्या आधी
माझी राख होण्या आधी
तू लवकर परत ये...
ती राख ही उडून जाण्याआधी...
No comments:
Post a Comment