स्तब्ध ऐशा सांजवेळी तू इथे असशील का
घेऊनी हातात माझा हात तू बसशील का ?
वीरहीणी सरीता निघाली सागराला भेटण्या
धाऊनी तुही तसा या बाहूत रे मिटशील का ?
पक्षी जैसे चालले घरट्याकडे निजण्या आता
भटकणार्या वाटसरुला जवळ तू करशील का ?
स्वप्नात माझ्या येऊनी तू जाग येता रडवतो
येऊनी सत्यात जवळी अश्रु ते पुसशील का ?
जाई रवि अस्तास आता केशरी नभ सोडुनि
स्मृति तैशा ठेऊनी रे तु तसा जाशील का
No comments:
Post a Comment