बरीच वर्षे आई मला गणपतीला कोकणात घेऊन चल म्हणून सांगत होती, पण तिची हि इच्छा या वर्षी पूर्ण झाली. ऑफिस मधून सुट्टी घेतली आणि आम्ही घरचा गणपती विसर्जन करून लगेच दुसऱ्या दिवशी कोकणात जायला निघालो. संध्याकाळी ५.३० वाजता आम्ही कांदिवली वरून निघालो. कसले बेकार ट्राफिक होते, नागोठाण्याला गोविंदा कामात कडे मस्त पिटल-भाकरी हंडली आणि महाड गाठे पर्येंत १२.३० वाजले. आज-काल आईला प्रवासाचा फार त्रास होतो म्हाणून आम्ही महाडला एम. आय. डी. सी. च्या रेस्ट हाउस मध्ये राहिलो आणि मस्त आराम केला. पहाटे ६ वाजता उठून आम्ही देवरुख साठी निघालो. मस्त वातावरण होते पहाटे कशेडी घाटाच्या सुरवातीला....
नंतर कशेडी घाटात....
कशेडी घाटातून दिसणारा परिसर.......
मस्त कशेडी घाटातल्या प्रवासाचा आनंद लुटत आम्ही पुढे निघालो.
आईला सलग फार प्रवास नको म्हणून पुढे आम्ही परशुराम घाटात, परशुरामाच्या मंदिरा कडे थांबलो.
जरा मंदिराच्या परिसरात फेर-फटका मारून आम्ही पुढे देवरूखच्या दिशेने निघलो. चिपळूणात नाश्ता करून १०.३०च्या दरम्यान आम्ही देवरूखला पोहोचलो. पोहोचल्या-पोहोचल्या साफ-सफाई करून, इकड-तिकडची सर्व कामे करून दुपारी मस्त आराम केला.
फ्रेश होऊन आम्ही, आईच्या आजोळी गणपती गेलो. हा आमच्या या ट्रीपवरचा पहिला गणपती.
कोकणातल्या पद्धती प्रमाणे सर्व पुरुष मंडळी, बाळ-गोपाळान बरोबर वाडीतल्या सर्व घरात आरती करायला गेली होती आणि महिला वर्ग मात्र नैवैद्याची तयारी करत होत्या.
थोड्या वेळाने वाडीतील सर्व मंडळी आरतीला मामाच्या घरी आली. काय मस्त आरती झाली. पु.ल.देशपांड्यांच्या, रावसाहेबांच्या भाषेत बोलायचे झाले तर "काय दणदणीत कि हो, एक छप्पर उडवून टाकल कि हो या आरतीने". आरती आवरून सर्व पानावर बसलो. गणपतीच्या प्रसादाचे जेवण जेवून आम्ही देवरूखला झोपायला गेलो.
पुढचा प्रवास पुढील भागात......लवकरच.....
No comments:
Post a Comment